सातारा :- काही दिवसा पुर्वी झालेल्या पावसात ओढ्याचे पाणी दुकान गाळयात शिरले होते. रस्त्याला ओढ्याचे स्वरुप आले होते. पुन्हा त्यावेळी काही भाग त्रिशंकू होता. आता पालिका प्रशासनाकडे आल्याने या भागात पालिका प्रशासन अलर्ट राहिले आहे. तरीही काही ठिकाणी जुन्या इमारतींना पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था नाही.

काही इमारती या ओढ्यालगत बांधलेल्या आहेत. असाच काहीसा प्रकार पश्चिम भागात सुरु आहे. पश्चिम भागात पेढ्याचा भैरोबा डोंगरावरुन काही नैसर्गिक ओढे हे समाधीचा माळ, महादरेकडून येणाऱ्या ओढ्याला मिळतात तर काही ओघळी या शुक्रवार पेठेतल्या ओढ्याला मिळतात. याच ओढ्यावर पाईप टाकून ओढाच बुजवण्याचा प्रकार सुरु आहे. यामुळे भविष्यात पावसाचे पाणी घरात शिरण्याची भिती असून स्थानिक नागरिक हे पुन्हा पालिकेच्याच नावाने शिमगा करणार आहेत.

आता मात्र स्थानिक नागरिक हे गप्प बसलेले आहेत. त्यांच्या गप्प बसण्यामागे गौडबंगाल काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

By Admin

You cannot copy content of this page