
सातारा -मुख्यमंत्र्यांचा साताऱ्यात दौरा असल्याने काहींनी नगरपालिकेची परवानगी न घेता मुख्य रस्त्यावर जाहिरात फलक लावले आहेत. या अनाधिकृत फलकावर कारवाई पालिकेच्या अतिक्रमण विभागाने केली नाही. फक्त नावालाच असलेल्या अतिक्रमण विभागावर महिन्याला लाखों रुपयांचा खर्च होतो. या पोसलेला विभाग बंद करावा, अशी सातारकरांची मागणी जोर धरू लागली आहे.

कोणत्याही नेत्यांचा दौरा, थोर नेत्यांची जयंती, पुण्यतिथी, काहींचे वाढदिवसा दिवशी शहरात परवानगी न घेता फुकटात बॅनरबाजी होते . यावेळी बॅनर कोणी लावला आहे, यावर अतिक्रमण विभाग कारवाई करत नाही.यामागे दम असणारा अधिकारी नाही की धाडस नाही, हेच सातारकरांना समजले नाही.
