सातारा : खडतर परिश्रम, जिद्द व चिकाटीच्या जोरावर सप्टेंबर 2023 मध्ये ‘कु.आकांक्षा बाळू मोरे’ हिने सीआरपीएफ कॉन्स्टेबल या पदाला गवासणी घालून आई-वडिलांच्या स्वप्नांना बळ दिले. सध्या तिने केरळ येथील पेरिंगमसेंटर मध्ये 11 महिन्याचे देशपातळीवरील लढवय्या युद्धाचे प्रशिक्षण पूर्ण केले. आर्मीमधील महत्वाचा टप्पा पूर्ण करून प्रशिक्षणानंतर प्रथमच ती आपल्या मायभूमीत परतल्याने तिच्या स्वागतासाठी कुटुंबीय व गावकऱ्यांनी फटाके व ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात भव्य मिरवणूक काढली. यावेळी घरोघरी महिलांनी तिचे कौतुक करत औक्षवण केले. यावेळी सैनिक भरतीसाठी युवतींना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे यासाठी गावकऱ्यांनी काढलेल्या मिरवणुकीचे विभाग व सर्व स्तरातून कौतुक केले. मिरवणुकीत तिच्या जल्लोषी केलेल्या स्वागताने फौजी आकांक्षा भारावून गेल्याचे दिसून आले.

या मिरवणुकीप्रसंगी सातारा तालुक्याचे पोलीस निरीक्षक मा.निलेश तांबे, माजी सभापती सौ.सरिता इंदलकर, धर्मराज घोरपडे, माजी उपसभापती संजय पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष महेशदादा गाडे, सरपंच मोहन वाघमळे, ज्येष्ठ नेते दिलीप निंबाळकर, इंद्रजीत ढेंबरे, माजी सरपंच प्रमोद जाधव, आबासो वाघमळे, सोसायटीचे व्हाईस चेअरमन जोतिराम करंजकर, रामदास जांभळे, बाजीराव करंजकर, तंटामुक्तीचे अध्यक्ष विजय वाघमळे, पोलीस पाटील दत्तात्रय पवार, सैदापूरच्या ग्रामपंचायत सदस्या संजीवनी धनवे, सौ.वनिता पवार, विक्रम पवार, सुधीर जाधव, प्रवीण पवार, मंगेश पाटील, आयुब मोकाशी,बबन वाघमळे, माजी सैनिक सतीश वाघमळे, शरद कुंभार, चंद्रकांत मोकाशी, विनायक शिंदे, मनोज यादव,रतन पवार, एकनाथ सणस, श्रीपती जांभळे, नंदकुमार मोरे, शिवनाथ बामणे, प्रमोद मोरे, शंकर मोरे यांच्यासह आजी-माजी सैनिक संघाचे पदाधिकारी व विभागातील मान्यवर, युवक, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. याप्रसंगी सातारा जिल्हा आजी -माजी पॅरामिलिटरी सैनिक संघ व विविध मान्यवरांच्या वतीने ‘आकांक्षा मोरे’ हिला सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन तिचा सन्मान केला. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत फौजी आकांक्षाचे कौतुक केले.

पीआय निलेश तांबे म्हणाले, सातारा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. आकांक्षाने सैन्यदलात उंच भरारी घेऊन ग्रामीण भागातील जांभळेवाडी गावचा नावलौकिक वाढविला आहे. गतवर्षीच्या सीआरपीएफ भरतीमध्ये तिची जिल्ह्यातून एकमेव निवड होऊन या सैन्यदलात भरती होण्यासाठी व प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी घेतलेले अविरत परिश्रम कौतुकास्पद आहे. आई-वडिलांच्या पाठबळावर तिने हे यश संपादन केले आहे. येथील तिचा सन्मान सोहळा पाहता मी भारावून गेलो आहे. या देशसेवेमध्ये तिची पदोन्नती होऊन नावलौकिक होण्यासाठी तिने सदैव प्रयत्नशील असावे. लष्करी क्षेत्रात या रणरागिनीने मिळवलेले यश जिल्ह्यातील मुलींसाठी ठरत आहे.

यावेळी सभापती सौ.सरिता इंदलकर, महेश गाडे, तसेच पॅरामिलिटरी संघाचे अध्यक्ष माणिकराव कदम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक भरत मोरे व प्रस्ताविक इंद्रजीत ढेंबरे यांनी केले. आभार सरपंच मोहन वाघमळे यांनी मानले.

By Admin

You cannot copy content of this page