
मेढा : जावली तालुक्यातील प्रस्थापिताचा ठेकेदार कार्यकर्ता यांचा चिठ्ठा पिल्ला माझ्याकडे आहे . तो ठेकेदार नादाला लागला तर जावलीचा सुपुत्र म्हणुन पुरुन उरेन अशी जहरी टीका करत. स्वराज्य पक्षाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अंकुश बाबा कदम यांनी मेढा येथे विश्रामधाम येथे आयोजित पत्रकार परीषदेत केली . जावली तालुक्यातील विकास कामे नक्की सर्वसामान्यकरीता कि ठेकेदाराकरीता केले जात असुन असा प्रश्न जावलीत निकृष्ठ दर्ज्याच्या कामावरुन निर्माण झाला आहे. विकास कामाचे ठेके मॅनेज करत ठेक्यातुन फक्त पैसा काढायचा असा एकमेव उद्योग जावलीतील ठेकेदार करत असल्याची टीका यावेळी अंकुश बाबा कदम यांनी केली .
जावली तालुक्यातील विकास कामे झाली पाहीजेत मात्र मिरवुन घेत निकृष्ठ कामे करत माया गोळा करण्याचा एकमेव उद्योग त्या ठेकेदाराकडुन सुरु आहे . आम्ही नवखे आहोत जावलीच्या विकासाच दृष्टीकोण घेवुन जनतेपुढे येत आहे. मात्र पोटसुळ उठलेला ठेकेदार सदैव विरोध करुन पोळी भाजण्याचा उद्योग करत आहे. मला नेहमीच जावलीत विकासच पर्व निर्माण करायच आहे याकरीता चर्चेला तयार आहे. मात्र माझ्या या शोषीत गुणाचा कोणी गैरफायदा घेण्याचा उद्योग केला तर याद राखा मी पण जावलीचा सुपुत्र आहे पुरुन उरल्याशिवाय राहणार नाही अशी टीका कदम यांनी केली .
जावली तालुक्यात पर्यटनाला चालना देत असताना निसर्ग सौदर्याचा फायदा घेत रोजगार निर्माती करण माझा मनोदय आहे . जावली तालुक्यातील वर्षानुवर्ष रखडत पडलेले सिंचनाचे प्रकल्प जावलीच्या प्रगतीला खिळ घालणारे आहेत.निवडणुका आल्यावर जनतेला सिंचन प्रकल्पाचे स्वप्न दाखवयाचे अन मत मिळवायचा हात एकमेव उद्योग जावलीत आजपर्यत झाला आहे . मात्र यापुढे जावलीची सुज्ञ जनता आता या अपवृत्तीला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही.
जावलीत आरोग्य सेवेची लक्तरे वेशीला टांगली आहेत . मेढ्या सारख्या प्रमुख ठिकाणी ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका नसल्यामुळे सर्वसामान्याना याचा फटका आरोग्य सेवेत बसत आहे . याकरीता मेढ्यात स्वखर्चाने नवीन रुग्णवाहिका देण्याचा माझा मनोदय असल्याचा यावेळी कदम यांनी व्यक्त केला. जावली तालुक्यातील आरोग्य विभागातील रिक्त पदाकरीता पाठपुरावा करुन लवकरच रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याचा माझा प्रयत्न राहील अशी भावना त्यानी पत्रकार परीषदेत व्यक्त केली.
यावेळी उमेश जुनघरे , शंकर दुदळे , सचिन जवळ , यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
