
गोडोली (प्रतिनिधी) : लाडकी बहिण योजना सुरळीत झाली असताना आता आजी माजी सरपंचांना पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे.मुंबई येथे शासनाच्या वतीने राज्यभरातील सरपंचांना एकत्रित महामेळावा घेण्यात येणार असून यावेळी सरपंचांचा सन्मान करुन पेन्शन योजना आणि प्रत्येक जिल्ह्यात सरपंच भवन उभारण्यात येणार असल्याची माहिती सरपंच परिषदेचे अध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी सांगितले.
महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था निर्माण झाली तेव्हा पासून प्रथमच गाव कारभार करणाऱ्या सरपंचांचा महा शासनाच्या वतीने राज्यस्तरावर प्रथमच असा सन्मान करण्यात येणार आहे. त्याच वेळी आजी माजी सरपंचांना पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय आणि प्रत्येक जिल्ह्यात सरपंच भवन उभारण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे हे सरपंच महामेळाव्यात जाहीर करण्यार आहेत. याबाबत नुकतेच राहुरी ( शिर्डी) येथे शिवसेनेचे सचिव संजय मोरे, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार नाथराव कराड, पद्माकर मोराडे यांच्या सोबत सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडली.यावेळी याबाबतची सरपंच परिषदेचे अध्यक्ष जितेंद्र भोसले, सरपंच विजय बलमे यांनी माहिती दिली.
पुढील आठवड्यात मुंबई येथे सरपंच महामेळावा शासनाच्या वतीने आयोजित करण्यात येणार असून यावेळी सर्व सरपंचांचा सन्मान करण्यात येणार आहे. महामेळावा यांच्या तयारी बातमी सरपंच परिषदेने पुढाकार घेतला असून राज्यातील सर्व सरपंच मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
