संग्रहित छायाचित्र

सातारा : उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीचे नेते, माजी राज्यमंत्री आणि प्रदीर्घ काळ आमदार राहिलेले त्यांचे सहकारी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी, निषेधार्थ आणि वेदनादायी असल्याचे अजित पवार यांनी सोशल मीडिया पोष्टमध्ये म्हटले आहे. या हल्ल्याचा निषेध करत त्यांनी या घटनेची सखोल चौकशी केली जाईल आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाई केली जाईल असे सांगितले.

या हल्ल्यामागील सूत्रधारांना पकडले जाईल, अशी खात्री त्यांनी दिली. बाबा सिद्दीकी यांच्या निधनाने पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. “अल्पसंख्याक बांधवांसाठी लढणारा आणि धार्मिक सलोख्यासाठी झटणारा एक चांगला नेता आपण गमावला आहे”, असेही अजित पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही बाबा सिद्दीकीच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

By Admin

You cannot copy content of this page