
फलटण (वार्ताहर) : निंबळक, तालुका फलटण येथील गावच्या शिष्टमंडळाने, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेऊन, निंबळक गावचे संदीप कांबळे यांना आमदारकीची उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे.
संदीप कांबळे हे केंद्र संचालक, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, केंद्र सातारा या ठिकाणी कार्यरत असून, ते गेल्या २० वर्षात कामगार कल्याण केंद्राच्या माध्यमातून अनेक योजना व उपक्रम तसेच समाजातील सर्वच घटकांना शासनाच्या विविध योजना व उपक्रमांचा लाभ मिळवून देण्यासाठी अविरतपणे प्रयत्न करीत आहेत.
एकूणच त्यांनी शासन स्तरावरती सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. गेली ३ वर्षे महाराष्ट्रात सलग ३ वेळा प्रथम क्रमांकाने कामगार नोंदणी केली असून, याबद्दल त्यांचा शासनाच्यावतीने सन्मानजनक सत्कार देखील करण्यात आलेला आहे. सर्वांच्या हाकेला धावून जाणारा सर्वसामान्य कार्यकर्ता अशी संपूर्ण परिसरात त्यांची ओळख आहे.
ते सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात. त्यांना समाजाभिमुख कार्याच्या माध्यमातून जिल्हा व राज्य पातळीवरील विविध सामाजिक पुरस्कार देखील मिळालेले आहेत.
निंबळक येथील शिष्टमंडळामध्ये श्री. संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहनराव नाईक निंबाळकर, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक भोजराज नाईक निंबाळकर, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक दत्तात्रय शिंदे, निंबळक नंबर २ विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन धनसिंग कदम, व्हा. चेअरमन अमृत पवार, पतसंस्थेचे संचालक मेघराज नाईक निंबाळकर, संचालक युवा नेते शंभूराजे नाईक निंबाळकर, निमराज नाईक निंबाळकर, कृष्णराज नाईक निंबाळकर,सेवानिवृत्त शाखा अभियंता बी. ए. भोसले रावसाहेब, सेवानिवृत्त ई.एस.आय. आनंदराव भोसले, सेवानिवृत्त प्राचार्य बाबासाहेब गंगावणे, सोसायटीचे माजी चेअरमन दादासाहेब कापसे, श्री संत ज्ञानेश्वर पतसंस्थेचे व्यवस्थापक देवानंद कापसे, रामराजे मोटर वाहतूक संस्थेचे व्यवस्थापक उदय कापसे, ग्रामपंचायतचे सदस्य युवा नेते सुजित भैय्या रनवरे, सेवानिवृत्त बँकेचे कर्मचारी राहुल भोसले, ग्रामपंचायत सदस्य समीर गायकवाड, काकासाहेब आडके, गणपत पिसाळ, अशोक गायकवाड, रामभाऊ सस्ते, पतसंस्थेचे संचालक रवींद्र भोसले, जालिंदर ढमाळ, गजानन निंबाळकर, विलास यादव, गणेश ढमाळ, दादा चव्हाण, महेश भोसले, महेश गाडेकर,गजानन बनसोडे, सुरज भोसले, भैय्या भोसले, तेजस खरात, नितीन भोसले, गणेश कापसे, तानाजी चव्हाण, सोनू बनसोडे, सागर भोसले, पुनीत भोसले, महादेव रिटे, महेश बुधनवर, प्रेम भोसले,सागर राऊत, अंकुश चव्हाण, शाम निंबाळकर, राजू रनवरे, सार्थक बनकर, शुभम यादव, विलास भोसले, सागर राऊत, तानाजी चव्हाण, जनार्दन कापसे, गणेश ढमाळ तसेच निंबळक गावातील तरुण कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी या शिष्टमंडळाचे निवेदन स्विकारून, नक्कीच आपल्या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन दिले आहे.
