सातारा– प्रेम प्रकरणाच्या संशयावरून कोरेगाव तालुक्यातील धुमाळवाडी (नांदगिरी) येथील विशाल चंद्रकांत शिंदे याने आपल्या भरधाव कारने जोरदार धडक देऊन निलेश जाधव यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. कारच्या धडकेत जाधव हे गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांच्यावर साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

दसऱ्याच्या दिवशी ही घटना घडली असून या घटनेत निलेश जाधव यांचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत थेट पोलीस मुख्यालय गाठले. आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर 302 कलमानुसार तात्काळ गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात आली.मयत निलेश जाधव यांच्या पत्नी पूनम निलेश जाधव यांनी फिर्याद दिली आहे.

By Admin

You cannot copy content of this page