
सातारा -प्रतिनिधी एका राजकीय पक्षाच्या जिल्हा कार्यालया लगत, एसटी स्टँडच्या पाठीमागे, पोलीस ग्राऊंडसमोर आणि मुख्य रस्त्याला खेटून वैद्यकिय दुकान रेटून उभे केले आहे. याची माहिती घेतली असता कागदपत्रांची परफेक्ट पूर्तता करुन नगरपालिका , शासकीय अधिकाऱ्यांची देणी देऊन प्रत्यक्षात नियमांचे उल्लंघन केलेले उघड दिसते. मजल्यावर मजले उभे करून कागदोपत्री असलेल्या पार्किंगचा गैरवापर केला आहे.तर प्रत्यक्षात येथे येणाऱ्या सर्वांसाठी मुख्य रस्त्यावर असताना याकडे हप्ते सुरू असल्याने संबंधित कोणतीच कारवाई करत नाहीत की या बड्या हस्तींवर कारवाई करण्याचा पोलीस, नगरपालिका, शासकीय अधिकाऱ्यांच्यात दम नाही, अशी चर्चा साताऱ्यात उघड सुरू झाली आहे.

या चर्चेच्या उगमापर्यंत गेल्यावर खरी ग्यानबाची मेख लक्षात येते.नुकतेच साताऱ्यात हे वैद्यकिय दुकान चांगले पैसे खर्चून उभारलेले आहे. यात कट प्रॅक्टिसच्या बळावर चांगला धंदा करायचाच हा चंग बांधून मजल्यावर मजले उभे केले आहेत. काही जणांना रस्त्यावर पार्किंग होऊ लागल्याने तिक्ष्ण नजरेने पाहिले असता नियम फक्त कागदोपत्री पालन करणाऱ्या या दुकानाच्या भागीदारांनी आपल्या पध्दतीने बांधकामाच्या सर्व परवानग्या घेतल्या मात्र त्याचे तंतोतंत पालन केले नसल्याचे बोलले जाते.
याचा एक नमुना म्हणजे कागदपत्री पार्किंग जिथे दाखवण्यात आले आहे, तिथे धंद्यातील सामान ठेवून ती जागा अडवली आहे. त्यामुळे इथे येणाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर वाहने चक्क रस्त्यालगत लावली जातात.
सामान्यांनी बांधकाम परवानगी काढताना कागदपत्री प्लॅन पेक्षा एक जरी चुक केली तर त्याला बुलडोझर लावून पाडण्याची भाषा करणारे शासकीय आणि नगरपालिकेचे तज्ञ महाशय या वैद्यकिय दुकानावर मेहरबान कसे, हे कोड काय सातारकरांना सुटेना.
