सातारा : अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी सातारा पोलिसांनी दोन जणांवर कारवाई केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 29 रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास बोरणे, ता. सातारा गावच्या हद्दीत असलेल्या निसर्ग हॉटेलच्या आडोशाला तेथीलच दत्तात्रय गंगाराम माने वय 53 हा अवैधरित्या दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून 1540 रुपये किंमतीच्या सीलबंद दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.

ही कारवाई सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार दादा वसंत स्वामी यांनी केली आहे.दुसऱ्या कारवाईत, मंगळवार पेठ, सातारा येथील मामा पान शॉप शेजारील टपरीच्या आडोशास स्वप्नील सतीश कदम रा. मंगळवार पेठ, सातारा याच्याकडून 910 रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.

By Admin

You cannot copy content of this page