
सातारा : सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी अंतीम टप्प्यात आली असुन गावोगावी गटनिहाय मोर्चेबांधणीला वेग आला आहे.
खटाव जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उद्योग विभाग महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांतबाबा खुस्पे-पाटील यांनी मोर्चेबांधणी चालू केली असून महायुतीच्या माध्यमातून ते खटाव गटातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. प्रशांतबाबा खुस्पे-पाटील यांनाच खटाव जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मिळावी अशी मागणी देखील नागरिकांमधून होत आहे.
खटाव जिल्हा परिषद गटातील अडचणी व विकासकामे महायुतीच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मी कटिबद्ध असून खटाव जिल्हा परिषद गटातील मतदार बंधू भगिनींनी मला पाठिंबा द्यावा, असे आवाहन प्रशांतबाबा खुस्पे-पाटील यांनी केले आहे.
