सातारा जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी शिबिरासाठी फोनद्वारे आपली पूर्व नोंदणी करावी. याशिवाय शिबिराला प्रवेश मिळणार नाही, असे आवाहन जयंत साठे यांनी केले आहे. दिव्यांग बांधवांनी कुलकर्णी – 9422029946, विनोद – 9881138052 यांच्याशी संपर्क साधून पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे. पूर्व नोंदणी शिवाय शिबिरामध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असेही संयोजकांकडून सांगण्यात आलेआहे.

प.पू.श्री. सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट, पुसेगाव येथे रविवार दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी सर्व दिव्यांगांची कृत्रिम अवयवासाठी मापे घेण्यात येणार आहेत. दिव्यांग व सोबती यांचेसाठी मोफत भोजन, चहा इ. सोय आहे. दत्ता चितळे यांनी आभार व्यक्त केले.

या शिबिरासाठी पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक सुजाता खटावकर, सुधीर अभ्यंकर, स्मिता जोशी, विनायक भिसे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

By Admin

You cannot copy content of this page