शाहूपुरी हद्दवाढ भागातील प्रभाग १ चे भाजप अधिकृत उमेदवार प्रतिक मोहिते यांच्या प्रचाराचा जोर दिवसेंदिवस वाढत चालला असून, नुकत्याच झालेल्या कॉलनीतील सभेत आणि बैठकीत रहिवाशांकडून त्यांना अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.बैठकीदरम्यान नागरिकांनी प्रतिक (आबा) मोहिते यांनी कार्यकाळात केलेल्या कामांचे खुलेपणाने कौतुक केले.

प्रभागात ड्रेनेज सुधारणा, स्वच्छता व्यवस्थापन, विकास व मूलभूत सोयी-सुविधांचे उभारलेले प्रकल्प या माध्यमातून प्रभागाचा चेहरा बदलल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.रहिवाशांनी सांगितले की “काम करणारा माणूसच आम्हाला हवा आहे. तुम्ही केलेले काम उत्कृष्ट आहे. त्यामुळे यावेळीही विश्वासाचं मतदान तुमच्याच नावावर जाणार!

या परिसरामध्ये निसर्ग कॉलनी,जरंडेश्वर मंदिर परिसर, जय मल्हार सोसायटी, शानबाग शाळा परिसर,टीसीपीसी,दौलत नगर,पिलेश्वरी नगर,करंजे वसाहत, कातकरी वस्ती ते थेट जुन्या कॅनॉल पर्यंतचा रस्ता हा या प्रभागामध्ये येतो.

या प्रभागात प्रतिक(आबा) मोहीते यांनी नागरिकांशी संवाद साधताना सांगितले की,”मी नेहमी तुमच्यातलाच एक राहिलो आहे. तुमच्या विश्वासामुळेच कामे करता आली आणि पुढील काळात याहून मोठे प्रकल्प राबवण्यासाठी तुमचा पाठिंबा अत्यावश्यक आहे.” कॉलनीमधील महिलांनी, ज्येष्ठांनी व युवकांनी प्रतिक मोहीते यांना प्रचंड उत्साहाने पाठिंबा दर्शवत मतदानात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.

प्रभाग १मध्ये प्रचाराचा वेग वाढत असून,नागरिकांच्या प्रतिसादामुळे प्रतिक मोहीते यांची निवडणूक अधिकाधिकजोर धरताना दिसून येत आहे. लोक विकास म्हणजे प्रतिक (आबा) मोहिते म्हणत आहेत.

By Admin

You cannot copy content of this page