समाज जीवनाशी एकरूप झालेल्या पत्रकार बांधवांच्या आज अनेक समस्या आहेत. समस्यांच्या विळख्यात जखडलेल्या अशा घटकांना संघटित करून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास व आत्मसन्मान जागृत करण्याचे मोठे एक आव्हान होते. सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे यांनी हे शिव धनुष्य हाती घेऊन जिल्ह्यातील विस्कळीत झालेल्या पत्रकारांना संघटित करण्याचे काम मोठ्या कौशल्याने हाती घेतले. त्यांच्या या प्रयत्नांना यशही आले. पत्रकार बंधूंसाठी एक सकारात्मक ऊर्जा घेऊन हरीष पाटणे यांची घोडदौड सुरू आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा पत्रकार संघाने अल्पावधीतच आपल्या कार्याचा ठसा संपूर्ण राज्यभर उमटवला आहे. त्यांचे कार्य कौतुकास्पद असून असंख्य पत्रकारांना त्यांच्या नेतृत्वाचा लाभ होत आहे.

पत्रकारांचे संघटन करताना त्यांना दिलेला विश्वास आज ते सार्थकी करून दाखवीत आहेत. एक आपुलकीचा रेशीम धागा त्यांनी त्यांच्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवला आहे. पत्रकारांच्या असंख्य प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका घेत त्यांनी शासन दरबारी अत्यंत प्रभावीपणे हे विषय मांडले आहेत. या नेतृत्वाने आपले सर्वस्व पणाला लावत कोणाची भीडबाड न ठेवता पत्रकारांच्या व्यथांना न्याय देण्याची भूमिका ते प्रामाणिकपणे बजावत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच पत्रकारांचा त्यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे.

पत्रकारांच्या मदतीला धावून जाताना त्यांच्या अडचणी व समस्या चे निराकरण करण्यासाठी त्यांची सातत्याने धडपड सुरू आहे. मराठी पत्रकार परिषदेच्या 87 वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्यांनी पत्रकारांच्या मनामनात एक आत्मविश्वास निर्माण केला आहे. रोखठोक पत्रकारिता म्हणून संपूर्ण राज्यात हरीष पाटणे यांनी आपला नावलौकिक उंचावला आहे. अशा नेतृत्वाखाली सातारा जिल्हा पत्रकार संघाची आकाश भरारी सुरू आहे. पत्रकार संघासाठी स्वतंत्रपणे इमारत उभी करण्यामध्ये हरीष पाटणे यांचे योगदान मोलाचे ठरले आहे जिल्ह्यातील पत्रकारांसाठी हक्काचे एक ठिकाण म्हणून आज साताऱ्यात जिल्हा पत्रकार संघाचे कार्यालय मोठ्या दिमाखात उभे राहिले आहे. हरीष पाटणे यांनी अशक्य ते शक्य करून दाखविले आहे. न्यायाला साथ व अन्यायाला लाथ हा त्यांचा स्वभाव धर्म असल्याने ते सर्वसामान्य पासून ते पत्रकारांच्या गळ्यातले ते ताईत बनले आहेत. पत्रकार बरोबरच सर्वांना आपला हक्काचा माणूस वाटणारे हरीष पाटणे यांचे जनमानसातील स्थान खूप मोठे आहे.

संघटन कौशल्याच्या जोरावर ते आज पत्रकारांच्या व्यथांना न्याय मिळवून देत आहेत. पत्रकारांना एकाच झेंड्याखाली आणण्याची मोठी किमया त्यांनी घडवून आणली आहे. अर्थात यासाठी त्यांना अनेक समस्या व अडचणीवर मात करण्यासाठी परिश्रम घ्यावे लागले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हा पत्रकार संघाने मोठी भरारी घेतलेली आहे पत्रकारांबरोबरच आज त्यांच्या कुटुंबियांनाही या नेतृत्वाचा एक आधार वाटत आहे. पत्रकारांच्या व्यथा व वेदनांना न्याय देताना प्रसंगी काही कठोर निर्णयही हरीष पाटणे यांना घ्यावे लागत आहेत अर्थात या नेतृत्वाने बेधडकपणे आपल्या कार्याचा ठसा हा जनमानसावर उमटवला आहे. आपल्या जिवाभावाच्या सहकाऱ्यांच्या पाठबळावर ते आज या क्षेत्रात गतिमानतेने प्रवास करीत आहेत.

दैनिक पुढारीचे व्यवस्थापक जीवनधर चव्हाण व विनोद कुलकर्णी यांची अखंड साथ लाभल्याने पत्रकारांच्या प्रश्नांची ते सोडवणूक करीत आहेत. पत्रकारांना संघटित करणे त्यांच्यामधील मतभेद दूर करणे वेगवेगळ्या विचारसरणीचे पत्रकारांना एका विचाराने बांधणे हे तसे खूप मोठे कठीण काम होते. अशा घटकांची हरीष पाटणे यांनी वज्रमुठ बांधून खऱ्या अर्थाने पत्रकारांच्या विकासात्मकतेला गती देण्याचे काम ते करीत आहेत. असे पाहिले तर हरीष पाटणे हे एक संघर्षातून उभे राहिलेले नेतृत्व आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी आज पत्रकारितेमध्ये उत्तुंग भरारी घेतली आहे. अर्थात यासाठी त्यांना अनेक अडथळे समस्या यांना सामोरे जावे लागले आहे. आपल्या सहकाऱ्यांना उत्तम आरोग्य बरोबरच त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षितता मिळावी यासाठी अखंडपणे झटणाऱ्या हरीष पाटणे यांच्या कार्याची दखल घेत त्यांना महाराष्ट्र शासनाच्या पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्षपदी त्यांना लाभले आहे. पत्रकारांसाठी एका ध्येयाने झपाटलेल्या हरीष पाटणे यांनी मात्र सातारा जिल्ह्यातील पत्रकारासाठी खूप मोठे योगदान देत आहेत.

भविष्यात पत्रकारांसाठी सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे नेतृत्व झटत आहे अनेक शासन दरबारी धुळखात पडलेल्या प्रश्नांना ते खंबीरपणे वाचा फोडत आहे असे एक प्रभावी व संवेदनशील नेतृत्व पत्रकरांना लाभल्याने सातारा जिल्ह्यातील पत्रकारांचा भविष्यकाळ हा निश्चितच उज्वल राहणार आहे.

श्रीरंग काटेकर (जनसंपर्क अधिकारी गौरीशंकर नॉलेज सिटी सातारा.)

By Admin

You cannot copy content of this page