
सातारा – गेल्या कित्येक दिवस चालू असलेल्या गोडोली गावातील महादेव मंदिर या पासून गेलेल्या ओढ्यावरील अतिक्रमण तसेच अनाधिकृत पूल बांधकाम करण्यात आले आहे. या अतिक्रमणा विरोधात सामाजिक कार्यकर्ते अजय पार्टे हा एकटाच लढतोय.
साताऱ्यातील मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण असताना ही एकही नगरसेवक, लोकप्रतिनिधी आवाज उठवत नाही. नेत्यांच्या बगलबच्च्यांनी अतिक्रमण केले असताना पालिकेचा अतिक्रमण विभाग त्याला हात लावत नाही. त्यामुळे गोडोलीतील अतिक्रमण विरोधात अजय पार्टे यांचा वन मॅन आर्मी लढा सुरू आहे. गोडोलीतील अतिक्रमण विरोधात तक्रार दाखल करुन पाठपुरावा करत नगरपालिका प्रशासनाला अतिक्रमण काढायला लावले.

दरवर्षी पावसाळ्यात गोडोलीतील ओढ्यावर असलेल्या मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरते,पुरजन्य परिस्थिती निर्माण होते. याबाबत नगरपालिका काहीच करत नाही. प्रशासनाकडे तक्रार करून दखल घेतली नसल्याचे अतिक्रमणाचा पसारा अधिक वाढत चालला आहे.याविरोधात नगरपालिकेकडून हातोडा मारला नाही तर १० ते १५ जून दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात उपोषणाचा इशारा दिला आहे.हा लढा फक्त ओढ्यावरील अतिक्रमण काढून नैसर्गिक मोकळा श्वास घ्यावा, यासाठी असल्याचे अजय पार्टे यांनी जाहीर केले आहे.

यावेळी अतिक्रमणाबाबतची सर्व पुरावे असणारी कागदपत्रे घेऊन उपोषण करणार आहे. गोडोलीतील अतिक्रमण याविरोधात वन मॅन आर्मी लढा आता जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात उपोषण करणार असल्याने नगरपरिषदेच्या प्रशासनाला चांगलीच गार येणार आहे.
