सातारा (प्रतिनिधी) : ऐतिहासिक साताऱ्याच्या नगरपालिकेच्या लेखापाल यांना अधिकारात नसताना विशिष्ट हेतू साध्य न झाल्याने मुख्याधिकाऱ्यांनी थेट कार्यमुक्त केले.

लेखापालांची नियुक्ती ही वित्त विभागाच्या अखत्यारीत असून मंत्रालय स्तरावरुन होते.त्यांच्या कामाचा दोष अहवाल सादर करुन करता येत असताना आणि अधिकारात नसताना सातारच्या मुख्याधिकारींनी कायदेशीर अभ्यास कमी असल्याने घिसाडघाई करत थेट कार्यमुक्त केले.

यावर लेखापालांनी थेट मॅटमध्ये जाऊन यावर न्याय मागितला असता मुख्याधिकाऱ्यांच्या घिसाडघाईवर ताशेरे ओढत लेखापालांना पुन्हा रुजू करून घेण्याची नामुष्कीची वेळ आली.

ऐतिहासिक साताऱ्यात नगरपालिकेचा कारभार विविध उपक्रमातील उल्लेखनीय कामगिरीने सर्वदूर लौकिक पोहचला आहे. मात्र याच पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी अज्ञानापोटी की विशिष्ट हेतू साध्य करताना अडचण आल्याने कर्तव्यदक्ष लेखापाल शबनम शेख यांना थेट कार्यमुक्त करून दाखवले.या अन्यायाविरुद्ध शबनम शेख यांनी थेट मॅटमध्ये जाऊन सत्य कैफियत मांडली. कायदेशीर दृष्टया चौकशीअंती त्यातील तत्थ उघड झाले. मुळात मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती ही नगरविकास तर लेखापालांची नियुक्ती ही वित्त विभागाच्या अखत्यारीत येते. नगरपालिकेत लेखापाल हा प्रतिनियुक्तीवर असून काही कारणास्तव मुख्याधिकाऱ्यांना त्याचा फार तर कारवाईसाठी अहवाल पाठवता येतो. थेट कार्यमुक्त करण्याचा अधिकार नसताना ‘हम करोसा कायदा ‘ या वृत्तीने लेखापाल शबनम शेख यांना कार्यमुक्त केले होते.

साताऱ्यात मुख्याधिकारी म्हणून दुसऱ्यांदा विनींग खेळत असल्याने नेत्यांपासून कर्मचारी आणि सातारकरांचा सर्व अंदाज आल्याने प्रत्येक कामात परफेक्ट हेतू साध्य करण्यात ते माहिर झाले आहेत.यातच लेखापाल हा अडसर दूर करण्यासाठी नसलेला अधिकार एकतर्फी वापरून पालिका संचालनालयाच्या परस्पर केलेली कारवाई मॅट मधील निकाल देताना ताशेरे ओढवून घेत नाचक्की करुन घेण्याची वेळ आली.

पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना या लेखापालाला परस्पर कार्यमुक्त करण्याचे अधिकार नाहीत,असा स्पष्ट महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई सेंटचे प्रशासकीय सदस्य देवाशिष चक्रवर्ती यांनी ७ मार्च २४ रोजी रोजी दिला आहे. या प्रकरणात आकसापोटी एकतर्फी कार्यमुक्तीला अंतरिम स्थगिती देत लेखापाल शबनम सलीम शेख यांना सातारा नगर परिषदेमध्ये लेखापाल तथा सहायक संचालक पदावर पुन्हा रुजू करण्याचा आदेश दिले आहेत.

शबनम शेख या साताऱ्यात दि.11 सप्टेंबर २०२३ पासून प्रतिनियुक्तीवर होत्या.अन्यायकारक कार्यमुक्तीला शबनम शेख यांनी मॅट मध्ये आव्हान दिले होते. तर या प्रकरणात शासनाच्या वतीने सादरकर्ता अधिकारी म्हणून अर्चना कोलोलगी यांनी काम पाहिले. याचिकाकर्त्याच्या वतीने ॲड.गौरव बांदिवडेकर, अँड.भूषण दिनकर यांनी सहकार्य केले.

या प्रकरणी शबनम शेख यांनी सहसंचालकाकडे (लेखा व कोषागार) न्याय मागितला असता त्यांनी तर “सध्या घरीच थांबा,नंतर कळवू,”अशी काही तरी संशयास्पद भूमिका घेतली. वास्तविक त्यांनीच या गंभीर प्रकारालाविरोध करायला हवा होता, मात्र त्यांनी सर्व बाजूंनी तयार असलेल्या मुख्याधिकाऱ्याची बाजू घेतली.त्यामुळे नेत्यांच्या मेहरबानीने ठाण मांडून बसलेले मुख्याधिकारी आणि हेतू साध्य झाला की हवा तसा निर्णय देणाऱ्या सहसंचालकांचे मॅटने जणू कायदेशीर अज्ञात उघड करत ताशेरे आढळल्याने खळबळ उडाली आहे.

मुख्याधिकारी गाशा गुंडाळणार कधी याचीच उत्सुकता..!

साताऱ्यात दुसरी विनींग खेळणारे मुख्याधिकाऱ्यांने नेते, कार्यकर्ते, ठेकेदार आणि सातारकरांची नाडी ओळखली आहे. गुपचूप गुपचूप खूप काही करत सर्वांना खूश करण्यात हा गडी चांगलाच माहीर झाला आहे.याचा प्रत्यय सातारकरांनी ओळखला आहे. त्याचे कायदेशीर अभ्यास कच्चा, घिसाडघाईने निर्णय, हेतू साध्य करताना आलेला अडसर दूर करण्यासाठी कुछ भी मिस्टीक करणाऱ्या या मुख्याधिकाऱ्यावर मॅट ने ताशेरे ओढले. आता साताऱ्यातून गाशा गुंडाळून जाणार कधी याची उत्सुकता लागली आहे.

By Admin

You cannot copy content of this page