
सातारा : फलटण एज्युकेशन सोसायटी फलटणचे मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज फलटण या प्रशालेत उपशिक्षिका या पदावर कार्यरत सौ. वैशाली कांबळे यांना तेजस फाऊंडेशन नाशिक चा २०२४ चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
निंबळक गावच्या सौ. वैशाली संदिप कांबळे या (M.SC.,M.Ed. DSM ) या गेली १९ वर्ष फलटण एज्युकेशन सोसायटी मध्ये कार्यरत आहेत. तर सध्या मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज फलटण या प्रशालेत उपशिक्षिका या पदावर कार्यरत आहेत. त्यांचा विविध शैक्षणिक उपक्रमात सहभाग असतो. एक उपक्रमशील शिक्षक म्हणून विविध संस्था व संघटना यांचे मार्फत राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले आहेत. तसेच सामाजिक व शैक्षणिक कार्यात त्यांचा पुढाकार असतो. मैत्री सामाजिक सेवा संस्था, निंबळक या संस्थेच्या उपाध्यक्षा म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. त्यांनी महिलांसाठी अनेक रोजगाराच्या संधी स्वखर्चाने उपलब्ध करून दिल्या आहेत. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवण्याचे काम त्यांच्या माध्यमातून दरवर्षी केले जाते. तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेसाठी मार्गदर्शन केले जाते. स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी वाचनालयात स्वखर्चाने पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. सौ.वैशाली कांबळे यांच्या या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन नाशिक येथील तेजस फाऊंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार २०२४ साठी त्यांची निवड करण्यात आली आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा २६ जून रोजी मौलानाआझाद संशोधन केंद्र टि. व्ही. सेंटर हाडको छत्रपतीसंभाजीनगर येथे संपन्न झाला . या पुरस्काराबद्दल सौ. वैशाली कांबळे यांचे विधान परिषदेचे मा.सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष श्रीमंतसंजीवराजे नाईक निंबाळकर, श्री संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन व जेष्ठ नेते मोहनराव नाईक निंबाळकर, जेष्ठ नेते भोजराज नाईक निंबाळकर, युवा नेते मेघराज नाईक निंबाळकर, युवा नेते शंभूराज नाईक निंबाळकर विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांचे कडून अभिनंदन होत आहे.
