
सातारा (प्रतिनिधी) – शासकीय कार्यक्रमाचे औचित्य साधून नगरपालिकेच्या परवानगी शिवाय काही चमकोगिरी करणाऱ्यांने शहरात फुकटात बॅनरबाजी केली आहे.याबाबत राजमुद्रा न्यूज नेटवर्कने लाईव्ह आणि सडेतोड बातम्या प्रसिद्ध केल्या. सातारा पालिकेच्या अतिक्रमण विभाग फक्त नावालाच असल्याचे सातारकरांच्या मनातील खदखद समोर आणली होती.याची नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने दखल घेतली नाही. मात्र वरुणराजाने अनाधिकृत बॅनरबाजी अक्षरशः रस्त्यावर पाडली. या पडलेल्या बॅनरची अवस्था पाहून अतिक्रमण विभागाने यापुढे बोध घ्यावा, अशी जोरदार चर्चा शहरात पसरली आहे.

सातारा शहरात अतिक्रमण बोकाळले मात्र पालिकेचा अतिक्रमण विभाग हा बॅनर, जाहिरात कोणाची हे पाहून कारवाई करतो. यावर सडेतोड पुराव्यानिशी राजमुद्रा न्यूज नेटवर्कने वार्तांकन केले.यावेळी हा बिनकामाचा विभाग असून यातील कर्मचारी काय करतात, हेच आजपर्यंत सातारकरांना समजले नाही.

साताऱ्यात दि.१८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या शासकीय कार्यक्रमाच्या आधीच नगरपालिकेची परवानगी न घेता अनाधिकृतपणे शहरात, मुख्य रस्त्यावर, मोक्याच्या ठिकाणी काही चमकोगिरी करणाऱ्यांनी जाहिरात, बॅनरबाजी केली आहे.याबाबत राजमुद्रा न्यूज नेटवर्कने पोलखोल करत पालिकेचा अतिक्रमण विभाग फक्त नावालाच असल्याचे सातारकरांच्या मनातील खदखद समोर आणली. तरीही फुटक्या बॅनरबाजीवर दम नसलेल्या पालिकेचा अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काही कारवाई केली नाही. याची थेट वरुणराजाने दखल घेत अनाधिकृत बॅनरबाजी अक्षरशः रस्त्यावर पाडली. त्यावर गटाराची पाणी वाहत असलेले पाहून अनेकांना चमकोगिरी करणाऱ्याची किव आली.तर अतिक्रमण विभाग पुन्हा फक्त नावालाच असल्याचे वरुणराजाने दाखवून दिले.

