सातारा : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सातारा जिल्हा दौऱ्यावर येत असून रविवारी १८ऑगस्ट २४ रोजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा साताऱ्यातून शुभारंभ करणार आहेत. या निमित्ताने त्यांचा दौरा जरी असला तरी यावेळी अनेक कार्यक्रम जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित केले गेले आहेत.

मुख्यमंत्री जिल्हा दौऱ्यावर येत असल्याने जिल्हा शासकीय विश्रामगृहात देखील जय्यत तयारी सुरू असून मुख्यमंत्री हे या शासकीय विश्रामगृहावर आल्यानंतर नव्याने झालेल्या विश्रामगृहाचे देखील उद्घाटन करणार असल्याची माहिती मिळत असून या विश्रामगृहाचे युद्ध पातळीवर काम सुरू आहे. मात्र शहरात अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य असून लोकांना भयंकर याचा त्रास होत असताना देखील जिल्हा प्रशासन याकडे लक्ष देत नाही. काही दिवसापूर्वी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील व शहरातील खड्डे मुजवण्यासाठी 15 ऑगस्ट ची डेट लाईन दिली असताना देखील संबंधित ठेकेदारांनी या खड्ड्यांची डागडुजी केली नसल्याचे पहायला मिळते. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

मात्र मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी दिवस रात्र जागून बांधकाम विभागाचे अधिकारी स्वागताची जय्यत तयारी करतोय मात्र सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचे पहायला मिळते.

By Admin

You cannot copy content of this page