
सातारा:- सातारा शहराच्या पश्चिम उपनगरातील स्वतःला सुप्रसिद्ध समजणाऱ्या एका डॉक्टरच्या कमाईचा नवा पॅटर्न चांगलाच तेजीत आहे. रुग्णाची मेडिकल पॉलिसी आहे काय? हे चातुर्याने ओळखून त्याला काही आजार असो. त्याच्या काही तपासण्या करून त्याचे डेंगूचेच निदान केले जाते.आणि त्याला पुढील उपचारासाठी दाखल करणे आणि उपचार देणे असे ह्या डॉक्टरने सर्रास रुग्णांच्या बाबतीत सुरू केले आहे.
एका बड्या दोन नेत्यांच्या चेल्यांशी असलेली मैत्री आपणाला या प्रकरणातून सहज बाजूला काढेल. हा आत्मविश्वास असल्याने या डॉक्टरने भलतेच धाडस करायला सुरुवात केली आहे. साताऱ्याच्या पश्चिम भागातील या डॉक्टरने सुरू केलेल्या नव्या उपचार पद्धतीत अनेक रुग्णांना डेंगू नसताना ही उपचार दिल्याचे समोर आले आहे. काही महागड्या वैद्यकिय तपासण्या करायला लावणे. त्याच्यात कमिशन खाणे आणि शे पाचशे रुपयात बरा होणारा आजार ५०,००० च्या पुढे खर्च दाखवू लागल्याने आजारापेक्षा उपचार भयानक वाटू लागला आहे.
या डॉक्टरला कोणी विचारण्याचा प्रयत्न केला असता अशा काही भाषेत रुग्ण व नातेवाईकांना सांगतो की उपचार घेतलेच पाहिजे जणू हा शेवटचाच पर्याय आहे. आणि हाच पर्याय आहे. अशी त्याची सांगण्याची पद्धत रुग्णांना भयभीत करून उपचार घेण्यास भागच पाडते. आजपर्यंत वैद्यकीय व्यवसायात पैसा मिळत नव्हता मात्र प्रतिष्ठा मोठी व्हावी यासाठी हा बडे नेत्यांच्या दोन चेल्यांशी वावरताना सातारकर यांनी पाहिले आहे. हाच डॉक्टर पैशाच्या मोहाने झपाटलेला, त्यांनी पैसा कमवण्यासाठी नवीन आयडिया काढली आहे. ओपीडीत रुग्ण आला की त्याच्याशी गोड बोलून मेडिक्लेम काढावा, असेल तर उपचाराला मोठी मदत होते. अशा पद्धतीने बोलतो की रुग्णाचा मेडिकल क्लेम आहे की नाही आणि कळलं की मेडिक्लेम आहे तर त्या रुग्णाचे निदान करण्याआधी तो अँडमीटच. आणि रुग्णाला लुटण्याची याची आयडिया चांगली तेजीत आहे. या डॉक्टर बद्दल अनेकांना शंका येऊ लागल्याने त्यांनी राजमुद्रा न्यूज नेटवर्कशी संपर्क साधून डॉक्टरने लुटलेल्याची कैफियत मांडली. त्याबाबत चौकशी अंती अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. हा सारा प्रकार मेडिक्लेम असलेल्या रुग्णांच्या बाबतीतच झालेला आहे. उपचाराचा खर्च पन्नास हजाराच्या अधिक झालेला आहे. मेडिक्लेम उतरणारे व्यक्ती या डॉक्टरची संबंधित असल्याने दोघांनी मिळून षडयंत्र रचल्याचा संशय काहींनी व्यक्त केला. डॉक्टरच्या बाबतीत आजपर्यंत गुण येत नव्हता अशी त्याची छाप होती. पण आता मात्र त्याच्याकडे गर्दी वाढू लागल्याने त्याने लुटीचा हा धंदा चांगलाच शोधून काढला आहे.
यात बड्या नेत्याच्या चेल्यांना विश्वासात घेतले असावे असे वाटू लागल्याने काही नागरिक कुठे तक्रार करत नाहीत.हे सर्व उपचार करताना डॉक्टर हुशारीने कायद्याच्या कचाट्यात अडकणार नाही.अशी कागदपत्रे तयार करतो. त्यामुळे रुग्णांना लुटल्याचं माहिती असूनही तक्रार करता येत नसल्याची अडचण निर्माण होत आहे.
राजमुद्रा नेटवर्कच्या प्रतिनिधीनी याबाबत शोध घेतला असता शहराच्या पश्चिम भागातील उपनगरात अनेकांच्या बाबतीत मेडिक्लेम असणाऱ्याला डेंगूचे निदान केलं असल्याचे निदर्शनास दिसून आले आहे. याबाबतीत रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरच्या लुटीचा डाव आमच्या आयुष्याची खेळतोय असाच प्रकार आहे. डॉक्टर रुग्णाच्या आयुष्याचा कमकुवत दोर मजबूत करणार असतो, मात्र या उपनगरातल्या डॉक्टरने रुग्णाच्या अज्ञानाचा असह्यतेचा फायदा घेत स्वतः मात्र पैसे कमवण्याचा राजमार्ग शोधून काढला आहे.
यात अवघ्या सातारा शहर परिसरात डेंगू ची साथ आल्याने या डॉक्टरने मेडिक्लेम असणारा रुग्ण आला की त्याला डेंगूच निदान करायचे आणि ५०,००० पर्यंत खर्चापर्यंत त्याचा उपचार घेऊन जायचं हे सर्रास प्रकार चालू केल्याने अनेक जणांना डेंगू नसतानाही त्याचा उपचार झाले असावेत अशी भीती वाटू लागली आहे. कारण याच डॉक्टरच्या आश्रयाखाली लॅबोरेटरीज, पॅथॉलॉजी, औषधे आणि मेडिक्लेम करणारा सगळेजण असल्याने कुणालाही याबाबत सत्यता काय हे जाणूनही बोलता येत नाही अशा अवस्था झाली आहे. पॅथॉलॉजीचे रिपोर्ट ही डेंगू येऊ लागले आहेत. मेडिकल पॉलिसी यशस्वी व्हावी यासाठी जे जे करावे लागतं ते ते सगळं हा डॉक्टर अगदी सराईतपणे करू लागला आहे. यामुळे अशा डॉक्टरच्या बाबतीत करायचं काय हा प्रश्न ?उपनगरातील लोकांच्या समोर उभा राहिला आहे आजारापेक्षा डॉक्टरचे भयानक असं चित्र या उपनगरात निर्माण झाले असून राजमुद्रा नेटवर्कने याबाबत सातत्याने पाठपुरावा ठेवला. संबंधित डॉक्टरला योग्य ती शिक्षा आणि समाजापुढे उघडा करण्यासाठी चांगलीच कंबर कसली असून पुरावे हाती आले की याबाबतीतील सोक्षमोक्ष आणि जे आहे ते समाजा पुढे उघड करण्याचे स्पष्ट केले आहे.
