सातारा : सातारा पालिकेच्या हद्दीत बॅनर लावण्यासाठी शुल्क भरून परवानगी घ्यावी लागते.हा नियम सर्वांसाठी असताना नेत्यांची पिल्लावळाकडून मात्र राजरोस कोणताही शुल्क न भरता, परवानगी न घेता कुठे ही कधी ही बॅनर लावतात. बॅनर कोणी लावला,त्यावर फोटो कोणाचे हे पाहून नगरपालिका अतिक्रमण विभाग कारवाई करतो. आजपर्यंत हाच पॅटर्न सुरू असून आता तर पालिकेच्या दारात अनधिकृत बॅनरबाजी झळकताना दिसते. पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी हे बॅनर पाहतात मात्र कारवाई करण्याचा दम नसल्याने त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने स्पष्ट झाले आहे.

शहर हद्दीत बॅनर लावण्यासाठी आकार आणि किती दिवसांसाठी यावर प्रतीदिन शुल्क निश्चित केले असून ते भरून सामान्य व्यक्ती, व्यापारी, व्यावसायिकांकडून बॅनर लावले जातात. याला अपवाद नेत्यांची पिल्लावळ, काही संघटना, फुटकळ कार्यकर्ते आहेत.कारण त्यांनी लावलेल्या बॅनरवर कारवाई करण्याचा दम असणारा सातारा नगरपालिकेला अधिकारी, कर्मचारी अद्यापही मिळाला नाही.

यातूनच पालिकेच्या दारात अनाधिकृत बॅनरबाजी करण्याचे धाडस आले आहे.पण याबाबत अतिक्रमण विभागाला ना शहाणपण ना कर्तव्याची जाणीव नसल्याने हे धाडस होत असल्याचे सातारकर उघड बोलताना ऐकू येत आहे.

By Admin

You cannot copy content of this page