
सातारा : सातारा जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी लेझर शोवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
गणपती मिरवणुकीत लेझर शो वापरल्यास कारवाईचा इशारा पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिला आहे. तसेच,ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या सोयीसाठी डॉल्बी धारकांनी आवाजाची मर्यादा पाळावी, अन्यथा त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
