शाहूपुरी इ प्रभाग ९ चे भाजप अधिकृत उमेदवार अक्षय जाधव यांच्या प्रचाराचा जोर दिवसेंदिवस वाढत चालला असून, नुकत्याच झालेल्या कॉलनीतील सभेत आणि बैठकीत रहिवाशांकडून त्यांनाअतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

बैठकीदरम्यान नागरिकांनी अक्षय जाधव यांनी कार्यकाळात केलेल्या कामांचे खुलेपणाने कौतुक केले.प्रभागात वॉकिंग ट्रॅक, स्विमिंग पूल,लाईटिंग, ड्रेनेज सुधारणा, स्वच्छता व्यवस्थापन, उद्यान विकास व मूलभूतसोयी-सुविधांचे उभारलेले प्रकल्प या माध्यमातून प्रभागाचा चेहरा बदलल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.रहिवाशांनी सांगितले की “काम करणारा माणूसच आम्हाला हवा आहे. तुम्ही केलेले काम उत्कृष्ट आहे. त्यामुळे यावेळीही विश्वासाचं मतदान तुमच्याच नावावर जाणार!

अक्षय जाधव यांनी नागरिकांशी संवाद साधताना सांगितले की,”मी नेहमी तुमच्यातलाच एक राहिलो आहे. तुमच्या विश्वासामुळेच कामे करता आली आणि पुढीलकाळात याहून मोठे प्रकल्प पाठिंबा राबवण्यासाठी तुमचा अत्यावश्यक आहे.” कॉलनीमधील महिलांनी, ज्येष्ठांनी व युवकांनी अक्षय जाधव यांना प्रचंड उत्साहाने पाठिंबा दर्शवत मतदानात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. प्रभाग ९ मध्ये प्रचाराचा वेग वाढत असून,नागरिकांच्या प्रतिसादामुळे अक्षय जाधव यांची निवडणूक अधिकाधिक जोर धरताना दिसून येत आहे.

By Admin

You cannot copy content of this page