सातारा दि. ४ जून : ४५ सातारा लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीमध्ये श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंहराजे भोसले यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी शशिकांत जयवंतराव शिंदे यांच्यापेक्षा ३२ हजार ७७१ इतकी मते अधिक मिळाली. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रमाणपत्र दिले. यावेळी निवडणूक निरीक्षक सुरेन धिरण व आर अर्जुन यांच्या सह अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे आदी उपस्थित होते.

उमेदवार निहाय मिळालेल्या मतांची संख्या पुढीलप्रमाणेश्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले – ५ लाख ७१ हजार १३४, शशिकांत जयवंतराव शिंदे – ५ लाख ३८ हजार ३६३, आनंद रमेश थोरवडे – ६ हजार ४८५ , प्रशांत रघुनाथ कदम – ११ हजार ९१२, तुषार विजय मोतलिंग – १ हजार ३०१, सयाजी गणपत वाघमारे – २ हजार ५०१, डॉ. अभिजित वामनराव आवाडे बिचुकले- १ हजार ३९५, सुरेशराव दिनकर कोरडे – ४ हजार ७१२, संजय कोंडिबा गाडे – ३७ हजार ६२, निवृत्ती केरु शिंदे – २ हजार ६७४, प्रतिभा शेलार – १ हजार १२३, सदाशिव साहेबराव बागल – ९५८, मारुती धोंडीराम जानकर – ३ हजार ९५१, विश्वजित पाटील-उंडाळकर – ३ हजार ४३८, सचिन सुभाष महाजन – २ हजार १५, सीमा सुनिल पोतदार – ३ हजार ४५८, नोटा – ५ हजार ५२२ या प्रमाणे मते मिळाली आहेत. तसेच अवैध मतांची संख्या एकूण २ हजार १८० आहे. प्रदत्त मते – २५ आहेत.

मतमोजणीची प्रक्रिया संपूर्ण यंत्रणेने सुरळीतपणे पारपाडल्याबद्दल जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. डुडी यांनीसंपूर्ण यंत्रणेचे आभार मानले. यावेळी त्यांनी कायदा वसुव्यवस्थेबद्दल पोलीस यंत्रणेचेही आभार मानले.

By Admin

You cannot copy content of this page