सातारा : विषारी औषध प्राशन केलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, श्रीमती मालन रमेश चव्हाण रा. पानमळेवाडी, वर्ये, सातारा यांनी विषारी औषध प्राशन केल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.

By Admin

You cannot copy content of this page